मुख्य सामग्रीवर वगळा

संधी opportunity म्हणजे काय?

 संधी म्हणजे इंग्रजी मध्ये opportunity

माझ्या मते एक अशी वेळ जी खूप काही बदल घडून आणू शकते मानवी जीवनात ती म्हणजे संधी. भिकारी पण राजा बनू शकतो फक्त संधी मिळाली पाहिजे.


संधीच (opportunity) सोन कसं कराल .?

संधीला सोन  म्हणतात कारण ती सोन्या सारखी महाग आणि अमूल्य असते या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की आपण काही तरी करावं जेणे करून आपल्या घरी चार पैसे यावेत. पण त्या साठी प्रयास करून काय करणार संधी तर पाहिजेल ना..! माणूस प्रत्येक वेळी या संधीच्या शोधात असतो आणि तो फक्त मागचा पुढचा विचार न करता कोणती संधी मिळते आहे याचा विचार करताना दिसतो.


संधी मिळते की मिळवावी लागते?

संधी कोठे आणि कशी मिळेल हे काही सांगता येईल अशी गोष्ट नाही. कारण संधी कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल ते सांगता येत नाही. प्रत्येक वेळी नवनवीन योजना आखल्या जातात पण माणसाच्या आयुष्यात अनेक संकटातून मार्ग आहे की नाही हे काही सांगता येत नाही. त्या वेळी आपल्याला आलेली संधी ओळखता आली पाहिजे. संधीचा पुरेपूर वापर करून तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. नाही तर मग तुम्ही खूप मागे पडले जाणार. संधी कधी आणि कशी भेटेल सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने संधी कशी भेटले याचा विचार करत राहील पाहिजे नाहीतर हातातून संधी कधी निसटून जाईल सांगू शकत नाही. 


संधी कशी मिळवणार?

आपण बऱ्याच वेळा जॉब मधे interview द्याला जातो त्यावेळी आपल्या जवळ एक संधी असते की आपण जॉब वर लागू शकतो. पण त्या वेळी एक तर जॉब भेटेल कि नाही... त्यामुळे आपल्या मनात एक वेगळं काहीतरी चालू असत. त्या वेळी जे काही भावना असतात त्यांना घेऊन आपण interview साठी जातो त्यावेळी जर चांगलं काम करतोय असं दिसलं तर तुम्ही जॉब साठी जाल नाही तर मग घरी. त्यामुळे संधी मिळवण्या साठी तुम्हाला तुमचं काम

आणि तुमचा आत्मविश्वास दाखऊन द्यावा लागेल... तर आणि तरच तुम्हाला संधी मिळणार.


संधी मिळवण्यासाठी काय-काय करणार.?

जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल पुरेपूर माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय तुम्ही त्या वेळी त्या काळात अनेक प्रकारचे अडचणी सहज सोडवू शकणार त्या करिता कायम आपल्या फील्ड मधे मास्टर बनण्याचा प्रयत्न करत राहील पाहिजे आणि बारीसारीक गोष्टी वर लक्ष ठेवले पाहिजे.बाहेरच्या जगात काय चालू आहे? आपण काय करतोय? काय केलं पाहिजे? या सर्व गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्ही संधी मिळिण्याकरिता सज्ज झाले असाल .


संधीच सोन कसं करावं.?

वर सांगिल्याप्रमाणे संधी खूप महाग असते अगदी सोन्या सारखी. पण त्याची किंमत कारण खरच सोप्प नाही. संधी कधी येते आणि जाते कळत नाही. त्यामुळं सगळी कामे करत असताना त्या कामामधून संधी निर्माण करता आली पाहिजे. आणि त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे नाहीतर हातातून निसटून गेलेली संधी पुन्हा निर्माण करता येत नाही. जसं की आर्मी ऑफिसर म्हणून कामावर जाऊन देशसेवा करायला पण एका विशिष्ट वयाची अट असते पण जर त्या वेळी आधी प्रयत्न केले तर ठीक नाहीतर मग ते स्वप्न तुटून जाईल आणि पुन्हा संधी निर्माण करता येत नाही.. त्यामुळं संधीच सोन करण आणि  महत्वाचं म्हणजे ती ओळखन खूप महत्वाचं आहे.

तुम्हाला जर अजून कोणत्या विषयावर जाणून घेणार असाल तर मला कॉमेंट मधे नक्की सांगा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समाजाने आता बदललेच पाहिजे

आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...* *Point to be noted* १. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.* २. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व...

कोरोना लसीकरण

कोराना लसीकरणा संबधीत महत्वाचे काही प्रश्न  1. लस का घ्यावी़? कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे. 2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का? सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.   3. लस सुरक्षित आहे का? सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत. 4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का? आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे  जे उपलब्ध आहे ते घ्या.  5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते? ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येव...