मुख्य सामग्रीवर वगळा

समाजाने आता बदललेच पाहिजे


आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...*


*Point to be noted*


१. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.*

२. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा.

३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा.

शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा.

४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील.

६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. 

७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम)

8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल.

१०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवू ठेवा.

११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू).

१२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.

१३. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा.

१४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायमच ऋणी रहा.

१५. घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा.                      

१६. मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या.

१७. निंदा टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. 

१८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. 

१९. आपलं आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा.

२०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा,

२१. आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा, 

*हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा...*

 

संधी म्हणजेच काय असते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संधी opportunity म्हणजे काय?

 संधी म्हणजे इंग्रजी मध्ये opportunity .  माझ्या मते एक अशी वेळ जी खूप काही बदल घडून आणू शकते मानवी जीवनात ती म्हणजे संधी. भिकारी पण राजा बनू शकतो फक्त संधी मिळाली पाहिजे. संधीच (opportunity) सोन कसं कराल .? संधीला सोन  म्हणतात कारण ती सोन्या सारखी महाग आणि अमूल्य असते या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की आपण काही तरी करावं जेणे करून आपल्या घरी चार पैसे यावेत. पण त्या साठी प्रयास करून काय करणार संधी तर पाहिजेल ना..! माणूस प्रत्येक वेळी या संधीच्या शोधात असतो आणि तो फक्त मागचा पुढचा विचार न करता कोणती संधी मिळते आहे याचा विचार करताना दिसतो. संधी मिळते की मिळवावी लागते? संधी कोठे आणि कशी मिळेल हे काही सांगता येईल अशी गोष्ट नाही. कारण संधी कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल ते सांगता येत नाही. प्रत्येक वेळी नवनवीन योजना आखल्या जातात पण माणसाच्या आयुष्यात अनेक संकटातून मार्ग आहे की नाही हे काही सांगता येत नाही. त्या वेळी आपल्याला आलेली संधी ओळखता आली पाहिजे. संधीचा पुरेपूर वापर करून तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. नाही तर मग तुम्ही खूप मागे पडले जाणार....

कोरोना लसीकरण

कोराना लसीकरणा संबधीत महत्वाचे काही प्रश्न  1. लस का घ्यावी़? कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे. 2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का? सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.   3. लस सुरक्षित आहे का? सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत. 4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का? आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे  जे उपलब्ध आहे ते घ्या.  5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते? ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येव...