मुख्य सामग्रीवर वगळा

आत्मविश्वास म्हणजे काय?

मित्रांनो आज आपण एक अश्या विषयावर बोलणार आहोत त्याची गरज खरतर प्रत्येकाला आहे. प्रत्येक जण मनातून खचलेला आहे. आणि या विशाल जगामध्ये हरवलेला आहे. त्यातच नुक्ता हा कोरोना नावाचा विषाणू ; बघितला तर तो दिसत पण नाही. पण त्यानं संपूर्णपणे जगाला थांबवलं. विशेषकरून काही जणांचा ऐव्हढा विश्वास होतो की काही पण होहो मुंबई कधी ही पूर्ण बंद होणार नाही. पण त्यांना पण दाखऊन दिलं गेलं की या निसर्गाच्या पेक्ष्या कोणी मोठ नाही. 
या सर्व पा्श्वभूमीवर वर आज बरेच जण आपल्या प्रियजनांना हरवून बसले आहेत. तर कोणाला जॉब सोडावा लागला तर काही जणांना जॉब वरून काढून टाकण्यात आले. परिणाम असा झाला की; माणसांची मन अस्वस्थ झाली, आणि त्यात त्यांना अनेक संकटातून बाहेर कसे पडावे याचे भान हरपले आहे. आज आपले घर आणि कुटुंनियोजन कसं करावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मग माणसाच्या डोक्यात त्याची व्यव्थापनाबाबत विचार करताना सहज एक एक प्लॅन तयार कारण चालू होत. कोणता जॉब करावा. की एखाद छोटा उध्योग सुरू करायचा असे अनेक प्रकारक्या अडचणींनी त्यांचा रस्ता अडवून ठेवू पाहतात पण जेव्हा आपण आपल्या मनातील विचारांचा प्रभाव लक्ष्यात घेऊन जेव्हा आपली पावले पडतात तेव्हा अनेक अडचींवर मात करण्यासाठी टाकत मिळते ती फक्त आणि फक्त आत्मवश्वासपूर्ण केलेली वाटचाल.

आत्मविश्वास करून टाकलेलं प्रत्येक पाऊल हे प्रगती कडे घेऊन जात असत. पण तेव्हडा विश्वास पाहिजे स्वतः जवळ. नाहीतर "म्हणणार जगाला उजेडात घेऊन जाणार. आणि आपण स्वतः मात्र काळोखात" तर अस न करता आपला विश्वास कमजोर न होता जेव्हा तुम्ही पाऊल उचलणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा.

एकदा एका गावात एक साधू महाराज आले. त्यांनी बघितलं की इथे तर सगळं किती बदलल होत या पूर्वी पण साधू महारजांनी या गावात वास्तव्य केले होत पण या वेळची परिस्थितीत बदल त्यांना जाणवला. त्यानं समजल की कित्तेक वर्षे झाली या गावात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं सगळी जमीन ओसाड पडली होती आणि भेगा पडलेल्या होत्या. जवळपास एकपण हिरव झाड दिसत न्हवत. साधू महाराज आले ही खबर मिळताच सर्व गावकरी त्यांच्या समोर गोळा झाले आणि आपले गारणे सांगू लागले. तेव्हा साधू महाराज म्हणाले की उद्या सकाळी आपण यज्ञ करुयात पाऊस नक्की पडेल. हा साधू महाराजांचा आत्मविश्वास होता की ते पाऊस पाडू शकतात. तर सकाळी तयारी सुरू झाली होम आणि यज्ञ त्यासाठी लागणरं सगळं साहित्य जामा करून ठेवण्यात आले होते. मग साधू महाराजांच आगमन होताच यजञकुंडात अग्नी प्रज्वलित करून यज्ञ सुरू केला तेव्हा एकच लक्ष्य गेलं की एक मुलगा छत्री घेउन आला होता. "तू छत्री का घेऊन आलास" अस विचरलं कोणी तरी त्या वेळी त्यानं उत्तर देत मान डोलवल सांगितलं की आज पाऊस पडणार ना मग मी भिजलो तर त्या साठी आणली आहे ही छत्री. त्या मुलाचा त्या बाबांवर विश्वास होता की हे पाऊस पाडणार आणि मी भिजणार हा त्याचा विश्वास होता.
गोष्ट संपली पण यात त्या साधू महाराजांनी पण एक विश्वास ठेवला होता की मी पाऊस पाडणार. हा होता त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास. आणि त्या मुलाला माहिती होत की आज पाऊस साधू महाराज पाडणार. हा त्या मुलाचा फक्त दृढविश्वास होता.

आणि आपण स्वतः वर विश्वास ठेवणार नाही पण दुसऱ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि त्यात अनेक प्रकारचे संकटे येतात आणि पुन्हा पुन्हा त्यात फसत जातो. तेव्हा मित्रांनो नेहमी स्वतः वरच विश्वास ठेवा. आपण कोण आहोत आणि काय करू शकतो आपली ताकत काय आहे हे फक्त आपणच जाणतो आपले प्लॅन्स आणि आपल्या स्वपनपूर्तीसाठी आत्मवि्वासपूर्वक वाटचाल सुरू करीत धेयासा ध्यास घेतला तर आत्मविश्वास कधीच कमी नाही होणार. तेव्हा संकटातून बाहेर कसं पडायचं हा विचार करून टाकलेलं ठोस गंभीर पाऊल म्हणजे आत्मविश्वास. 
आत्मविश्वास कधीच कमी पडून द्याचा नाही मित्रानो. 
पुन्हा भेटू.

-अक्षय साळुंखे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संधी opportunity म्हणजे काय?

 संधी म्हणजे इंग्रजी मध्ये opportunity .  माझ्या मते एक अशी वेळ जी खूप काही बदल घडून आणू शकते मानवी जीवनात ती म्हणजे संधी. भिकारी पण राजा बनू शकतो फक्त संधी मिळाली पाहिजे. संधीच (opportunity) सोन कसं कराल .? संधीला सोन  म्हणतात कारण ती सोन्या सारखी महाग आणि अमूल्य असते या जगात प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की आपण काही तरी करावं जेणे करून आपल्या घरी चार पैसे यावेत. पण त्या साठी प्रयास करून काय करणार संधी तर पाहिजेल ना..! माणूस प्रत्येक वेळी या संधीच्या शोधात असतो आणि तो फक्त मागचा पुढचा विचार न करता कोणती संधी मिळते आहे याचा विचार करताना दिसतो. संधी मिळते की मिळवावी लागते? संधी कोठे आणि कशी मिळेल हे काही सांगता येईल अशी गोष्ट नाही. कारण संधी कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल ते सांगता येत नाही. प्रत्येक वेळी नवनवीन योजना आखल्या जातात पण माणसाच्या आयुष्यात अनेक संकटातून मार्ग आहे की नाही हे काही सांगता येत नाही. त्या वेळी आपल्याला आलेली संधी ओळखता आली पाहिजे. संधीचा पुरेपूर वापर करून तुम्ही तुमच्या मार्गावर पुढे जाऊ शकता. नाही तर मग तुम्ही खूप मागे पडले जाणार....

समाजाने आता बदललेच पाहिजे

आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत ,त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत ,पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...* *Point to be noted* १. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.* २. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व...

कोरोना लसीकरण

कोराना लसीकरणा संबधीत महत्वाचे काही प्रश्न  1. लस का घ्यावी़? कोरोनामुळे १०० लोकांमध्ये २ ते ४ मृत्यु होत आहेत. लसिकरणामुळे दुष्परिणाम झाला तरी तो लाखात १ इतके कमी प्रमाणात आहे आणि तो सुध्दा प्राणघातक असेल असे नाही. म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसिकरण करणे जरूरी आहे. 2.लसिकरणाची कार्यक्षमता आहे का? सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्युपासून बचाव करण्यासाठी १०० टक्के कार्यक्षमता आहे. गंभीर कोविडच्या विरूध्द अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोगप्रतिकारक क्षमता आहे.   3. लस सुरक्षित आहे का? सर्व लसी पुर्णपणे सुरक्षित आहेत. 4. आम्हाला कोणती लस मिळणार? पर्याय आहे का? आता तरी सगळीकडे कोविशिल्ड - सिरम, पुण्याची लस उपलब्ध आहे. काही सेंटरमध्ये कोवाक्सिन आहे पण दोन्ही लसी अतिशय सुरक्षित आहेत त्यामुळे  जे उपलब्ध आहे ते घ्या.  5. दुसर्या टप्प्यात कोण-कोण लस घेवू शकते? ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार इ. यांना आपल्या जवळच्या सेंटरमध्ये लस घेता येईल. त्यासाठी कोविन ॲप वर नोंदणी करावी अथवा नामको लसिकरण केंद्रामध्ये येव...